ग्रामपंचायत रामपूर
ग्रुप मल्लाळ
ऐतिहासिक वारसाने समृध्द आणि डिजिटल गाव
३५००+
लोकसंख्या
१९५६
स्थापना वर्ष
१०+
विकास योजना
पदाधिकारी
श्री. मारुती तुकाराम पवार
सरपंच
श्री. लक्ष्मण मारुती ओलेकर
उपसरपंच
सौ. संगिता आनंदा भोये
सचिव
आमच्याबद्दल
ग्रामपंचायत रामपूर ग्रुप मल्लाळ
गावाविषयी महित्ती
या वेबसाइटच्या माध्यमातून आम्ही गावच्या कारभारात पारदर्शकता आणण्याचा आणि सर्व शासकीय योजना व माहिती थेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.
इतिहास
ग्रामपंचायत विषयी महित्ती
कसे पोहोचाल?
एस.टी. बसने: जत, सांगली, मिरज येथून रामपूर नियमित बस सेवा उपलब्ध आहे.
रेल्वेने: सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन 'ढालगाव'/जत स्टेशन वाळेखींडी आहे, जे ३० किमी अंतरावर आहे. स्टेशनवरून जतला पोहोचण्यासाठी स्थानिक जीप किंवा ऑटो रिक्षा उपलब्ध आहेत.
सदस्य मंडळ
श्री. मारुती तुकाराम पवार
सरपंच
"आपल्या गावाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत..."
श्री. लक्ष्मण मारुती ओलेकर
उपसरपंच
"सर्व ग्रामस्थांच्या सहभागानेच आपण गावाचा विकास साधू शकतो..."
श्री. आकाश दत्तात्रय तुरेवाल
सदस्य
श्री. गणेश विठ्ठल शिवशरण
सदस्य
श्री. समीर किसन शिवशरण
सदस्य
श्री. सुनील राजाराम माळी
सदस्य
सौ. अनिता दत्तात्रय चव्हाण
सदस्या
सौ. अमृता अरुण मासाळ
सदस्या
सौ. निलव्वा ईश्वरा चव्हाण
सदस्या
सौ. रुपाली प्रकाश माळी
सदस्या
सौ. शितल कैलास भोसले
सदस्या
सौ. सुरेखा बाजीराव कोळेकर
सदस्या
ग्रामपंचायत कर्मचारी
Sangita Ananda Bhoye
कर्मचारी
श्री. तानाजी शाबु नाईक
कर्मचारी
श्री. महादेव बाबू मंडळे
कर्मचारी
रामगड किल्ला आणि पर्यटन
ऐतिहासिक रामगड किल्ला
जत हा सांगली जिल्ह्यातील पूर्वेकडील तालुका. स्वतंत्रपुर्व काळात जत हे एक स्वतंत्र संस्थान होते. या संस्थाना अंतर्गत जत व डफळापूर ही दोन मोठी शहरे आणि ११७ खेडी समाविष्ट होती. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात अनेक गड , किल्ले, गढ्या बांधलेल्या आहेत. त्यातील काही छोटे किल्ले आणि गढ्या स्थानिक मातब्बर सरदारानी बांधलेल्या आहेत. स्वसंरक्षणा बरोबर प्रशासकीय कारभारासाठी छोटे किल्ले बांधले जात. अशाच प्रकारचा एक छोटेखानी गढी वजा किल्ला "रामदुर्ग" विजापूरचे सरदार डफळे यानी सतराव्या शतकात सांगली जिल्ह्यातील रामपुर या गावातील छोट्याश्या टेकडीवर बांधला. किल्ल्याचा आकार, संरक्षणाच्या सोई आणि पाण्याची व्यवस्था पाहाता हा किल्ला प्रशासकीय व्यवस्थेसाठी बांधला असावा असे म्हणता येइल. रामपुर गावातील टेकडीवर एक पुरातन हेमाडपंथी शिवमंदिर आहे. त्यामुळे या ठिकाणी लोकांचा वावर किल्ला बांधण्याच्या आधीच्या काळापासुन होता. तसेच या सपाट प्रदेशात ही एकमेव टेकडी असल्याने आजुबाजूच्या मोठ्या प्रदेशावर नजर ठेवता येते. त्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेसाठी किल्ला बांधण्यासाठी ही योग्य जागा होती
जत संस्थानाचे राजे डफळे सरदार यांचा इतिहास. डफळापूरचे पाटील सटवाजी चव्हाण यांनी १६८०च्या सुमारास आदिलशाहीकडून जत, करजगी, बार्डोल आणि कणद यांची देशमुखी मिळवल्यावर डफळे राजघराणे व जत संस्थान उदयाला आले. स्वसंरक्षणा बरोबर प्रशासकीय कारभारासाठी त्यांनी संस्थानात काही गढ्या व अनंतपुर- रामदुर्ग यासारखे छोटे किल्ले बांधले. सतराव्या शतकात जत शहरापासुन काही अंतरावर असलेल्या रामपुर गावातील छोट्याश्या टेकडीवर सरदार डफळे यानी छोटेखानी रामदुर्ग किल्ला बांधला. या सपाट प्रदेशात ही एकमेव टेकडी असल्याने दुरवर नजर ठेवता येते. या भागात असलेली हि एकमेव टेकडी व जत संस्थानाशी असलेली या भागाची जवळीक पाहाता हा किल्ला प्रशासकीय व्यवस्थेसाठी बांधला असावा.
शिवमंदिर
किल्ल्याच भव्य प्रवेशव्दार पूर्वाभिमुख आहे. दरवाजाची कमान शाबुत आहे. प्रवेशव्दारा समोरील दगडात कोरलेल्या काही पायर्या आहेत. किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज अजुनही बर्यापैकी शाबुत आहेत. तटबंदी दगड एकावर एक रचुन तयार केलेली आहे. दोन दगडांमधील भेगा भरण्यासाठी स्थानिक पांढर्या मातीचा उपयोग करण्यात आला आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजुला एक प्राचिन शिव मंदिर दिसते. शिव मंदिराच्या रोखाने चालायला सुरुवात करावी. मंदिराकडे जाताना वाटेत पडलेले मंदिराचे घडीव दगड पाहायला मिळतात. या प्राचिन हेमाडपंथी मंदिराचे सभामंडप व गाभारा असे दोन भाग एकेकाळी होते. त्यातील सभामंडप आता नष्ट झालेला आहे. त्याचेच अवशेष आपल्याला किल्लाभर पसरलेले दिसतात. शिव मंदिर दक्षिणाभिमुख आहे. सभामंडपाचे चार कोरीव खांब अजुन तग धरुन आहेत. त्यावरुन सभामंडपाची कल्पना करता येते. गाभार्याच्या दरवाजावर सुंदर कोरीव काम आहे. व्दारपट्टीवर गणपतीची मुर्ती आहे. गाभार्यातील पिंडीवरील छतावर फुलांची नक्षी कोरलेली आहे. मंदिर पाहुन झाल्यावर मंदिरासमोर असलेल्या झेंडा बुरुजाकडे जावे. हा बुरुज ढासळलेला आहे. या ढासळलेल्या बुरुजावर चढुन झेंड्यापाशी जावे. बुरुजावरुन किल्ल्या खालच रामपूर गाव व दुरवरचा परीसर दृष्टीक्षेपात येतो. झेंडा बुरुजावरुन तटबंदीवर उतरुन तटा वरुनच किल्ल्याची फेरी चालु करावी. तटावरुन फेरी मारताना शिव मंदिराच्या मागच्या बाजुस आल्यावर एके ठिकाणी दगडांची रास पडलेली दिसते. या ठिकाणी एखादी वास्तु असावी. पुढे गेल्यावर किल्ल्याच्या दक्षिणेला खालच्या बाजुला एक बांधीव तलाव दिसतो. तलावाच्य उत्तरेला एक घडीव दगडाची भिंत बांधलेली आहे. किल्ल्यावर पाण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. त्यासाठीच या तलावाची निर्मिती केली असावी. किल्ल्यावरुन या तलावा पर्यंत जाण्यासाठी तटबंदीत एक वाट ठेवलेली आहे. तटबंदी वरुन फिरताना किल्ल्याच्या प्रवेशव्दाच्या विरुध्द बाजुस आल्यावर तटबंदी आणि उत्तरेकडील बुरुज यांच्या मधे ही वाट होती. बुरुज आणि तटबंदीचे दगड कोसळुन ती आज बंद झालेली आहे. ही वाट पाहुन तटबंदीवरुन किल्ल्याला प्रदक्षिणा घालुन प्रवेशव्दारा पर्यंत आल्यावर आपली गड फेरी पूर्ण होते. गडाचा आकार छोटा असल्याने अर्ध्या तासात गड पाहुन होतो.
साभार - रमेश साहेबराव जाधव.
पर्यटक सुविधा
मार्गदर्शक
- • प्रशिक्षित स्थानिक मार्गदर्शक उपलब्ध
- • मार्गदर्शकाचे शुल्क: रु. १००/- प्रति तास
- • आगाऊ बुकिंग: +91 98765 43210
- • इंग्रजी आणि मराठी भाषेत मार्गदर्शन
निवास व्यवस्था
- • धर्मशाळा - रु. ३००/- प्रति दिवस
- • होमस्टे - रु. ८००/- प्रति दिवस
- • जवळील हॉटेल्स (५ किमी परिसरात)
- • बुकिंगसाठी: +91 98765 43210
इतर सुविधा
- • पार्किंग सुविधा
- • स्वच्छतागृहे
- • प्राथमिक उपचार
- • चहा-नाश्ता व्यवस्था
- • स्थानिक वाहन सेवा
भेटीसाठी माहिती
- • भेटीची वेळ: सकाळी ६ ते संध्याकाळी ६
- • प्रवेश शुल्क: रु. २०/- प्रति व्यक्ती
- • सर्वोत्तम हंगाम: ऑक्टोबर ते फेब्रुवारी
- • सुट्टीच्या दिवशी जास्त गर्दी
खाद्य सुविधा
- • स्थानिक जेवणाची व्यवस्था
- • चहा-कॉफी, नाश्ता
- • शुद्ध पाण्याची सोय
- • थंड पेये उपलब्ध
आपत्कालीन सेवा
- • तातडीची मदत: 112
- • जवळचे दवाखाना: २ किमी
- • पोलीस स्टेशन: ५ किमी
- • रुग्णवाहिका: +91 98765 43210
देणगी
रामगड किल्ला आणि मंदिराच्या संवर्धन व विकासासाठी आपली देणगी महत्वाची आहे
बँक खाते तपशील
खाते नाव: रामगड किल्ला विकास ट्रस्ट
बँक: स्टेट बँक ऑफ इंडिया
खाते क्रमांक: XXXXXXXXXX
IFSC कोड: SBIN0XXXXX
शाखा: रामपूर
UPI द्वारे देणगी
UPI ID: ramgad@upi
कोणत्याही UPI अॅप द्वारे देणगी करा
QR कोड स्कॅन करून देणगी करा
* देणगी १००% कर मुक्त आहे (कलम ८०G अंतर्गत)
संपर्कासाठी: +91 98765 43210
सूचना व कार्यक्रम
गावातील आगामी कार्यक्रम, सूचना आणि महत्त्वाच्या घोषणा.
सध्या कोणतीही नवीन सूचना किंवा कार्यक्रम नाही.
आमच्या सेवा आणि योजना
ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सेवा आणि शासकीय योजनांची माहिती.
जन्म दाखला
जन्म नोंदीसाठी आणि प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीत अर्ज करा. आवश्यक कागदपत्रे: हॉस्पिटलचे प्रमाणपत्र, ओळखपत्र.
मृत्यू दाखला
मृत्यूच्या नोंदीसाठी आणि प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीत अर्ज करा. आवश्यक कागदपत्रे: हॉस्पिटलचे प्रमाणपत्र, ओळखपत्र.
विवाह नोंदणी
विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक माहिती व अर्ज प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे. आवश्यक कागदपत्रे: वधू-वरांचे ओळखपत्र, फोटो आणि साक्षीदार.
घरपट्टी आणि पाणीपट्टी
तुमचा मालमत्ता कर आणि पाणी बिल भरण्याची सोय ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे. वेळेवर कर भरून गावाच्या विकासात योगदान द्या.
प्रधानमंत्री आवास योजना
सर्वांसाठी घरकुल योजनेबद्दल माहिती व अर्ज करण्यासाठी कार्यालयात संपर्क साधा. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
इतर दाखले
रहिवासी दाखला, ना हरकत प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधा.
फोटो गॅलरी



संपर्क साधा
तुमचे काही प्रश्न किंवा सूचना असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा.
ग्रामपंचायत कार्यालय
पत्ता: मु. पो. रामपूर ग्रुप मल्लाळ, ता. जत, जि. सांगली, महाराष्ट्र - ४१६४०४
फोन: +91 98765 43210
ईमेल: gp@ramgad.in
रामगड पर्यटन/ऐतिहासिक स्थळ
पत्ता: मु. पो. रामपूर ग्रुप मल्लाळ, ता. जत, जि. सांगली, महाराष्ट्र - ४१६४०४
फोन: +91 12345 67890 (ट्रस्ट)
ईमेल: fort@ramgad.in